मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका पाठोपाठ एक साखरपुडा व विवाह सोहळे झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, अर्चना निपाणकर, तेजपाल वाघ, कार्तिकी गायकवाड, अभिज्ञा भावे यांचा समावेश होता. आता या यादीत आणखीन एका मराठी अभिनेत्रीचा समावेश होणार आहे.

मराठी चित्रपट सृष्टीची सुंदर अभिनेत्री, उत्तम डान्सर व आयटम गर्ल म्हणून लोकप्रिय असणारी मानसी नाईक ही येत्या 11 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकणार आहे. आपल्या दिलखेच अदानी तरुण पिढीला घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीचा साखरपुडा 10 नोव्हेंबर 2020 रोजी झाला होता. 5-6 व्यक्तीच्या उपस्थितीत साखरपुडा केलेल्या मानसीचा विवाह सोहळा मात्र धूम धडाक्यात होण्याची शक्यता आहे.
मानसीचा हा प्रेम विवाह असून तिच्या होणाऱ्या जोडीदाराचे नाव प्रदीप खरेरा आहे. प्रदीप हा एक प्रोफेशनल बॉक्सर असून या खेळात त्याने भारताचे प्रतिनिधित्व करताना अनेक वेळा यश संपादन केले आहे. त्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत आशिया गटातून विजय मिळविला होता.
सध्या मानसीच्या घरी वेगवेगळे कार्यक्रम पाहायला मिळत असून मानसी याबद्दल वेळोवेळी अपडेट्स देत असते. काल मानसीच्या घरी ग्रहमख पूजा विधी पार पडली असून विवाहसोहळा पुण्यात असणार आहे. 1 दिवसावर लग्न सोहळा असल्याने प्रदीप ने एक कमेंट करून “एक दिवसात तुला घेऊन जाईल” असे म्हटले आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.