आपल्या अफलातून डान्स मुळे लोकप्रिय असणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकचा आज दिनांक 19 जानेवारी रोजी विवाह सोहळा पार पडला. गेल्या 2-3 महिन्यांपासून मानसीच्या विवाहाच्या चर्चा सोशल मीडियावर होत होत्या. ठरलेल्या मुहूर्ता प्रमाणे आज मानसी लग्नबंधनात अडकली आहे.
मानसीचा ज्या व्यक्ती सोबत लग्न झाले त्याचे नाव प्रदीप खरेरा आहे. प्रदीप हा एक आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे. हे दोघे गेली अनेक महिने एकमेकांच्या प्रेमात होते व दोघांनी एकमेकांसोबतच्या फोटोज् अनेकदा पोस्ट करून आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली होती. दोघांचा 10 नोव्हेंबर 2020 रोजी साखरपुडा झाला होता व त्याच वेळी लग्नाची तारीख देखील ठरली होती.
गेल्या काही दिवसांपासून मानसीच्या लग्नापूर्वीचे अनेक सोहळे अत्यंत धूम धडाक्यात पार पडलेले पाहायला मिळाले. काही व्हिडिओ मध्ये मानसी नाईक आनंदाने नाचताना देखील दिसून आली आहे. या प्रत्येक सोहळ्याला तिची जवळची मैत्रीण दीपाली भोसले – सय्यद ही देखील उपस्थित असल्याचे दिसून आले.
मानसी व प्रदीप दोघेही आज लग्नाच्या पेहरावात आकर्षक दिसत होते. दोघांचा मंगलाष्टका वेळीचा एक व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक महिन्यांच्या प्रेमाला विवाहात बदलून मानसी आज मिसेस खरेरा झाली आहे. दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
तुम्हीही दोघांना कमेंट मध्ये शुभेच्छा द्या व शेयर करायला विसरू नका.