4 जानेवारी 2021 रोजी झी मराठी वाहिनीवर “येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका सुरू झाली. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकण्यात यश मिळविले आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपापल्या अभिनयाने छाप पाडली आहे. आज आपण मालिकेत नवीन एन्ट्री केलेल्या “मोमो” बद्दल जाणून घेऊयात.

Mira Jagannath hot pics


“येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेत मोमोची भूमिका मीरा जगन्नाथ या अभिनेत्रीने साकारली आहे. मीराच्या मालिकेतील आगमनाने मालिकेत धमाल विनोद पाहायला मिळत आहेत. मालिकेत मीरा एका श्रीमंत घरातील मुलीची भूमिका साकारताना दिसून येत आहे.

Mira Jagannath hot pics

ओमकार आणि स्वीटू या दोघांच्या प्रेमात मोमो अडथळा ठरणार असेच दिसत आहे. कारण ओमची बहिण मालविका हिला ओमकारचे लग्न मोमो सोबतच लावून द्यायचे असते. त्यामुळे मीरा ही मालिकेत महत्त्वाचा भाग असणार आहे. मीरा खऱ्या आयुष्यात तिच्या बोल्ड फोटोज् मुळे नेहमीच चर्चेत असते.

 

मीरा जगन्नाथ ही तिच्या फोटोज् मुळे सोशल मीडियावर युवा पिढीचे आकर्षण ठरताना दिसून येते. येणाऱ्या काळात ती एक टॉपची मॉडेल देखील होवू शकते. मीरा यापूर्वी आपल्याला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत संजना नावाचे पात्र साकारताना दिसून आली होती. तसेच, तिने ईलूईलू या चित्रपटात देखील काम केले आहे. मीराला भावी आयुष्यासाठी “मर्द मराठी” तर्फे खूप खूप शुभेच्छा

Mira

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *