सध्या सेलिब्रिटींच्या लग्नाच्या बातम्या सर्वत्र पाहायला मिळत आहेत. गेल्या 1-2 वर्षात तर अनेक सेलिब्रिटींचे लग्न सोहळे पार पडलेले दिसून आले. आता आणखीन एका लोकप्रिय मराठमोळी जोडी लग्नबंधनात अडकलेली दिसून येत आहे. ही जोडी आहे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर.

Mitali marriage viral video


आज दिनांक 24 जानेवारी रोजी नातेवाईक व अनेक कलाकारांच्या उपस्थितीत या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. गेल्या 4 वर्षापासून सिद्धार्थ व मिताली एकमेकांना डेट करीत होते. तसेच, गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या लग्नाची लगबग सुरू झाली होती. शेवटी आज दोघांनी आपल्या प्रेमसंबंधाला नात्यात बदलले.

Mitali marriage viral video

सिद्धार्थ व मितालीचा विवाहसोहळा पुण्यातील ढेपे वाड्यात पार पडला. दोघेही लग्नातील पेहरावात सुंदर दिसत होते. या सोहळ्याला अभिज्ञा भावे, पूजा सावंत, गायत्री दातार, भूषण प्रधान, उमेश कामत अशा अनेक कलाकारांची उपस्थिती होती.

 

या दोघांची पहिल्यांदा ओळख 24 जानेवारी 2017 रोजी एका शूटिंग दरम्यान झाली होती व दोघांचा साखरपुडा 24 जानेवारी 2019 रोजी पार पडला होता. त्यामुळे दोघांनी लग्न देखील 24 जानेवारी रोजी करण्याचे ठरविले होते. सिद्धार्थ व मितालीला वैवाहिक आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.