गेल्या पंधरा दिवसात मराठीच्या 2 लोकप्रिय अभिनेत्रींचे लग्न झालेले पाहायला मिळाले. 6 जानेवारी रोजी अभिनेत्री अभिज्ञा भावे व डान्सिंग क्वीन मानसी नाईक ही 19 जानेवारी रोजी लग्न बंधनात अडकलेले पाहायला मिळाले. आता या यादीत मराठीतील लोकप्रिय कपल अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर यांचा समावेश होणार आहे.
सिद्धार्थ व मिताली या दोघांची ओळख 4 वर्षापूर्वी म्हणजेच 24 जानेवारी 2017 रोजी झाली होती. त्यामुळे या दोघांनी येत्या 24 जानेवारी रोजीच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर हे दोघे गेल्याच वर्षी लग्न करणार होते परंतु कोरोना मुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आले होते.
सध्या सिद्धार्थ व मितलीच्या लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमाचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहेत. त्यापैकीच एका व्हिडिओमध्ये सिद्धार्थ व मितालीचे प्रेम दिसून येत आहे. या व्हिडिओ मध्ये मितालीच्या हातावर मेहंदी लागली असल्याने स्वतः सिद्धार्थ होणाऱ्या बायकोला घास भरविताना दिसून येत आहे.
हळदी, मेहंदीच्या प्रसंगी काही कलाकार देखील उपस्थित असल्याचे दिसून आले. काही व्हिडिओ मध्ये स्वतः सिद्धार्थ व मिताली दोघेही गाण्यावर थिरकत असताना दिसून आले. या दोघांनी कधीच आपले प्रेम लपवून ठेवले नव्हते. आता दोघे आयुष्याची दुसरी इनिंग सुरू करताना दिसतील. सिद्धार्थ व मितालीला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.