दीड वर्षापूर्वी झी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या अग्गबाई सासूबाई मालिकेत अनेक चढउतार झालेले पाहायला मिळाले. मालिकेतील आसावरी व अभिजीत राजे यांच्या प्रेमाला मालिकेत उत्तमरीत्या दाखविण्यात आले. परंतु काही दिवसांपूर्वी आसावरीच्या सासऱ्याची भूमिका साकारणाऱ्या रवी पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले होते.
रवी पटवर्धन यांचे निधन मालिकेसाठी व कला क्षेत्रासाठी मोठा धक्काच होता. लॉकडाऊन नंतर अग्गबाई सासूबाई मालिकेत रवी पटवर्धन दिसून आले नव्हते. परंतु, मालिकेत त्यांची कमी प्रकर्षाने जाणवत होती. कारण मालिकेचे ते एक महत्त्वपूर्ण भाग होते.
अग्गबाई सासूबाई मालिकेत आजोबा नेहमीच कोंबडीच्या, चप्पल चोर, आसावरी अशी हाक मारताना दिसायचे. हा आवाज परत ऐकायला मिळणार की नाही असे वाटत असतानाच आता आजोबांची भूमिका मोहन जोशी दिसणार आहेत. त्यांचा एक प्रोमो देखील आला आहे.
4 जानेवारीपासून मालिकेत मोहन जोशी हे प्रेक्षकांना दिसणार आहेत. तसेच, त्यांचे स्वागत शुभ्रा व सोहम करताना काही फोटोज् मध्ये दिसत आहेत. मोहन जोशी हे देखील एक उत्तम कलाकार असून ते रवी पटवर्धन यांनी जागा उत्तमरीत्या घेऊ शकतात. मोहन जोशी यांच्या आगमनाने मालिका आणखीन मनोरंजक होईल अशी आशा आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका