झी मराठीची सध्या “माझा होशील ना?” ही मालिका टॉपला आहे. इतर मालिकांपेक्षा माझा होशील ना या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालेले पाहायला मिळत आहे. या मालिकेत मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता विराजस कुलकर्णी याची आई कोण आहे हे जाणून घेतल्यास तुम्हीही थक्क व्हाल.
माझा होशील ना? मालिकेत आदित्यची भूमिका साकारणाऱ्या विराजसची खऱ्या आयुष्यातील आईचे नाव आहे मृणाल कुलकर्णी. एके काळी मृणाल कुलकर्णी या अभिनेत्रीने आपल्या सोंदर्याने सर्वच स्तराच्या प्रेक्षकांना भुरळ घातली होती. तसेच, मृणालने अशा काही मालिकेत काम केले होते जे प्रेक्षकांना आजही स्मरणात असतील.
स्टार प्लस वाहिनीवर सण 2000 मध्ये सोनपरी नामक एक मालिका सुरू झाली होती. या मालिकेत मृणाल ने सोनपरीची भूमिका साकारली होती. राजा शिवछत्रपती, अवंतिका, दौपदी या मालिकेत देखील मृणाल आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. तसेच मृणाल ने मेड इन चायना, लेकर हम दीवाना दील अशा काही हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे.
मृणाल ने फतेशिकस्त, फर्जंद, रमा माधव, येल्लो, बबन अशा काही गाजलेल्या मराठी चित्रपटात देखील भूमिका साकारल्या आहेत. तसेच, तिने प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. विराजस हा जरी मृणाल कुलकर्णीचा मुलगा असला तरी अभिनयाचा वारसा त्याने स्वबळावर पुढे नेला आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका