आज काल एखाद्या व्यक्तीला लोकप्रिय होण्यासाठी स्वतःजवळ एखादे टॅलेंट असायला हवे. जर हेच टॅलेंट सोशल मीडियावर व्हायरल झाले तर कोणतीही व्यक्ती रातोरात स्टार होऊ शकते. आता एका मुलीचे काही चकित करणारे काही व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसून येत आहेत.
ज्या मुलीबद्दल बोलत आहोत, त्या मुलीचे नाव पारुल अरोरा आहे. 24 वर्षीय पारूल ही हरियाणाच्या अंबाला शहरात राहत असून ती एक उत्कृष्ठ जिमनास्ट आहे. वयाच्या 9व्या वर्षापासूनच पारुल ने जिमनॅस्टिकची तयारी करीत आहे. या खेळातील तीचे काही थक्क करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
पारुल अरोरा ही खूप अगोदर पासून व्हिडिओ पोस्ट करीत होती. परंतु तिने जेंव्हा साडी वरून बॅक फ्लिप केले, तेंव्हा पासून ती अधिकच लोकप्रिय झाली. आता पारुलच्या प्रत्येक व्हीडिओला लाखो व्ह्यूज येत असतात. एक दोन वेळा नव्हे तर 6-7 वेळेस देखील बॅक फ्लिप करू शकते.
साडी मध्ये डान्स करणे देखील महिलांना शक्य नसते आणि पारुल मात्र अशक्यप्राय स्टंट करताना दिसून येते. खरे तर साडीवरील स्टंट करताना ती 3 वेळा पडली देखील होती. पारुल फक्त लोकप्रिय होण्यासाठी हे करीत नसून तिला नॅशनल लेव्हल वर गोल्ड मेडल देखील मिळाले आहे. पारुल सारख्या कौशल्यवान मुलीला “मर्द मराठी” तर्फे खूप खूप शुभेच्छा
माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा व शेयर करायला विसरू नका.