2020 पासून अनेक सामान्य जनते सोबतच काही दिग्गज सेलिब्रिटींच्या निधनाच्या वाढता ऐकायला मिळाल्या. काहींचा कोरोना मुळे तर काहींचा अन्य कारणाने निधन झाल्याच्या वार्ता समोर आल्या. आता 2021 च्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी समोर आली आहे.

कलर्स वाहिनीवर चालू असलेला लोकप्रिय शो बिगबॉस संबंधी एका महिला सदस्याचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. बिग बॉस शो ची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकड या मुलीचे निधन झाले आहे. पिस्ता हिचे एका रोड अपघातात मृत्यू झाल्याचे समजते.
बिग बॉसच्या विकेंड का वार ची शूटिंग आटपून काल रात्री दिनांक 15 जानेवारी रोजी 28 वर्षीय पिस्ता आणि तिची एक सहाय्यक स्कूटी वरून घराकडे जात होती. परंतु खूप अंधार असल्याने पिस्ताला खड्ड्याचा अंदाज आला नाही व रस्त्याच्या मधोमध पडल्याने एक व्हॅन तिच्या अंगावर गेल्याने तिचा मृत्यू झाला.
पिस्ता सोबत असलेली तिची सहाय्यक रस्त्याच्या कडेला पडल्याने ती थोडक्यात बचावली. या दुःखद घटनेमुळे अनेक हिंदी कलाकारांनी पोस्ट करून दुःख व्यक्त केले आहे. बिग बॉस सोबतच पिस्ता खतरों के खिलाडी साठी देखील काम केली आहे. पिस्ता धाकड हिला भावपूर्ण श्रद्धांजली.
तुम्हीही कमेंट मध्ये श्रद्धांजली व्हा व शेयर करायला विसरू नका