14 जून 2020 रोजी बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अनेकांनी दोषी ठरविले होते. आता रिया चक्रवर्ती परत एकदा एका कारणाने ट्रोल होताना दिसून येत आहे.
रिया चक्रवर्ती हीच्या सध्या काही फोटोज् व्हायरल होताना दिसून येत आहेत. या फोटो मध्ये तिला एका व्यक्तीने मिठी मारल्याचे दिसून येत आहे. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता राजीव लक्ष्मण आहे. राजीव यानेच रिया सोबतच्या 2 फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्या होत्या.
सुशांत फॅन्सचा राग पाहून राजीवने नंतर त्या फोटोज् डिलीट देखील केल्या. सुशांतच्या मृत्यूचे रियाला काही दुःख नसून, आता ती दुसऱ्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत असल्याचे आरोप सुशांतचे फॅन्स करीत आहेत. यावरून इतक्या महिन्यानंतर पार्टी करणाऱ्या रियाला सुशांत फॅन्सनी आणखीन माफ केलेले दिसून येत नाही.
दुसरीकडे राजीव लक्ष्मण याने रियाला अगोदर पासूनच पाठिंबा दिला होता. फोटो डिलीट केल्यानंतर राजीव म्हणाला, “माझ्या पोस्ट मुळे मला अनावश्यक त्रास झाला आहे, रिया माझी मैत्रीण आहे, मी तिला परत भेटण्यासाठी आनंदी आहे.” या सर्व गोष्टींमुळे रिया व राजीव ट्रोल होताना दिसून येत आहेत.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.