2020 मध्ये बॉलिवूडला हादरून टाकणारी एक मोठी घटना घडली. बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनी 14 जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर सीबीआय, ईडी, एनसीबी या सर्वांनीच याप्रकणाच्या खोलात जाऊन तपासणी केली.
या प्रकरणात एनसीबीने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला ड्रग्स सेवन प्रकरणी अटक देखील केली होती. नंतर रियाला जामीन देखील मिळाला होता. आता अनेक दिवसांनंतर रिया चक्रवर्ती घराबाहेर पडलेली दिसून येत आहे. यावेळी ती भाऊ शौविक चक्रवर्ती सोबत बाहेर पडलेली दिसून आली.
अभिनेत्री रिया चक्रवर्ती ने यावेळी घातलेले टी शर्ट चर्चेचा विषय ठरत आहेत. रियाने घातलेल्या टी शर्ट वर “लव्ह इज पावर” म्हणजेच “प्रेमातच शक्ती आहे” असे लिहिले होते. हा संदेश नेमके कोणासाठी आहे हे समजू शकले नाही. रियाला अटक होण्यापूर्वी देखील असेच टी शर्ट तिने घातले होते.
त्या टी शर्टवर, “रोझेस आर रेड, वायलेट आर ब्ल्यू, लेट्स स्मॅश द पेट्रिआकि, मी अँड यू” असे प्रिंट केलेले होते. कदाचित हा संदेश तीने तीच्या जवळच्या व्यक्तींना दिला असावा. कारण तिच्या जवळच्या सर्व मित्रांनी हाच संदेश सोशल मीडियावर पोस्ट करीत रियाला न्याय मिळावा अशी मागणी केली.