झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायको सर्वांनाच माहिती आहे. या मालिकेत “माया” हे पात्र साकारणारी अभिनेत्री रुचिरा जाधव हिच्या आयुष्यात सध्या एक गंमतशीर प्रकार घडला आहे. रूचीराच्या एका पोस्टमुळे अनेक फॅन्स मध्ये गैरसमज झालेला दिसून आला.
झाले असे की, रूचीराची सख्खी बहिण ऋतुजा हिचा 3 जानेवारी रोजी साखरपुडा झाला. रूचीराने तिच्या बहिणीच्या साखरपुड्याचे काही फोटोज देखील तिच्या अकाऊंट वर पोस्ट केले. परंतु दोघी बहिणी थोड्याफार सारख्या दिसत असल्याने अनेक फॅन्स च्या मनात गोंधळ निर्माण झाला व अनेकांनी रूचीरालाच शुभेच्छा दिल्या.
हा सर्व प्रकार पाहून रूचिराने एक व्हिडिओ पोस्ट करून असे सांगितले, “3 तारखेला जीचा साखरपुडा झाला ती मी नसून माझी बहिण ऋतुजा आहे. हा गैरसमज कसा झाला माहिती नाही. माझ्या साखरपुड्याला आणखीन वेळ आहे व त्यावेळी मी सर्वांना सांगेलच.”
पुढे हातावरची मेहंदी दाखवीत रुचिरा म्हणाली, “हे बघा मी इतकीच मेहंदी काढली आहे. नवरीची मेहंदी नसून नवरीच्या बहिणीची आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छा साठी धन्यवाद.” रुचीराची बहिण ऋतुजा देखील मॉडेलिंग क्षेत्रात असून तिचा साखरपुडा अंकित ढगे सोबत पार पडला.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका