गेल्या 10 दिवसांपासून झी मराठी वाहिनीवर “येऊ कशी तशी मी नांदायला” ही नवीन मालिका सुरू झाली आहे. या मालिकेला काही एपिसोड मध्येच प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या नवीन मालिकेत अभिनेत्याच्या आईचे पात्र साकारणाऱ्या शुभांगी गोखले यांच्या बद्दल जाणून घेऊयात.
येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत शुभांगी या शकूची भूमिका साकारताना दिसत आहेत. शुभांगी यांना सर्वांनी काहे दिया परदेस या मालिकेत अभिनेत्रीच्या आईच्या भूमिकेत पाहिलं होते. आता त्या राजा राणीची ग जोडी या मालिकेत देखील आईची भूमिका साकारताना दिसत आहे. परंतु, खऱ्या आयुष्यात शुभांगी एका लोकप्रिय अभिनेत्रीची आई आहेत.
शुभांगी गोखले यांच्या मुलीचे नाव सखी गोखले आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून छाप पाडणाऱ्या सखी ने त्याच मालिकेतील सुव्रत जोशी या अभिनेत्या सोबत लग्न केले आहे. वडील स्व. मोहन गोखले व आई शुभांगी गोखले प्रमाणेच सखी मध्ये देखील अभिनय कौशल्य दिसून येते.
सखी ने काही चित्रपटात देखील काम केले आहे. रंग्रेज, पिंपळ, तुकाराम या काही चित्रपटात तिने उत्तम भूमिका साकारल्या आहेत. तसेच, येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे 2020 रोजी सखीचा गोदावरी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले हे कलाकार पाहायला मिळतील. दोघी माय लेकींना मर्द मराठी तर्फे खूप खूप शुभेच्छा
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका