सोशल मीडिया वर रातोरात स्टार व्हायला वेळ लागत नसते. कोणता व्हिडिओ किती व्हायरल होईल सांगता येत नसते. प्रत्येक महिन्याला एखादी तरी व्हिडिओ समोर येते व त्याची सर्वत्र चर्चा होत असते. सध्या महाराष्ट्रात 2 लहान मुलांच्या भांडणाची व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसून आली.
हा व्हिडिओ बुलढाणा जिल्ह्यातील आंबशी(ता. चिखली)गावातील होता. व्हिडिओ मध्ये 2 लहान मुले शाब्दिक भांडण करताना दिसून आले. एकाचे नाव कार्तिक तर दुसऱ्याचे नाव शंकर असे होते. त्या भांडणात कार्तिक नामक मुलगा शंकरला “शंकरपाळ्या” नावाने चिडवत होता. अन् त्याच शंकरपाळ्या शब्दामुळे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.
या व्हिडिओ नंतर कळंबेश्र्वर गावात या दोघांचीच चर्चा होवू लागली होती. सर्वजण या दोघांना घेरा घालून बसलेले दिसून येत आहेत. आता या दोघांचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल होवू लागला आहे. ज्यामध्ये दोघे जण एकत्र बसून चहा पिताना दिसून येत आहेत व त्यांच्या भोवताली काही गावकरी देखील दिसून येत आहेत.
एकत्र चहा पिऊन जणू शंकर आणि कार्तिक हे दोघे भांडण मिटले असल्याचे सांगत आहेत. या दोघांची इतकी चर्चा झाली आहे की गावात चक्क न्यूज मीडियावाले देखील येताना दिसून येत आहेत. काहीही असो कार्तिक व शंकर ने एका छोट्याश्या व्हिडिओ मधून अख्ख्या महाराष्ट्राला हसविले, हे नक्की.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका