सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. प्रत्येक महिन्याला एखादी तरी व्हिडिओ समोर येते व ती तुफान व्हायरल होत असते. सध्या महाराष्ट्रात 2 लहान मुलांच्या भांडणाची व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे. सगळीकडे फक्त तोच व्हिडिओ पाहायला मिळत आहे.

Shankarpalya viral video


हा व्हिडिओ बुलढाणा जिल्ह्यातील कळंबेश्वर(ता. मेहकर) गावातील आहे. व्हिडिओ मध्ये 2 चिमुकले शाब्दिक रुपात भांडण करताना दिसून येत आहेत. दोघांत काहीतरी बाचाबाची झाली तेंव्हा एक मुलगा दुसऱ्या मुलाला चापटीत मुस्काट फोडीन म्हणतो. दुसरा मुलगा रागात येऊन त्याला “शंकरपाळ्या” म्हणतो.


नंतर पिवळ्या टीशर्ट वाला मुलगा म्हणतो, “माझी खिज काहून पाडली तुहा(माझी चीड कशाला पाडली तू). आबन रहा भाऊ(शिस्तीत रहा). नंतर तो दुसरा मुलगा परत जोरात त्याला शंकरपाळ्या म्हणून चिडवितो. त्यावेळी पिवळ्या शर्ट वाला मुलाला आणखीन जास्त राग आलेला दिसले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका प्रचंड व्हायरल झाला की गावकऱ्यांना त्या दोघांना एकत्र बोलवावे लागले. नंतर गावातल्या काही लोकांनी फेटा व शाल घालून सत्कार करायला लावलेली एक फोटो देखील व्हायरल होत आहे. दोघांचे भांडण अखेर मिटले असे कॅपशन द्वारे अनेक जण सांगत आहेत. काहीही असो, सध्या “शंकरपाळ्या” हा व्हिडिओ सर्वांना खळखळून हसवत आहे.परंतु ती फोटो त्या दोघांची नाही असे अनेक जण सांगत आहेत.

Shankarpalya viral video

तुम्हालाही व्हिडिओ आवडला तर नक्की शेयर करा व कमेंट करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.