गेल्या काही महिन्यांपासून अनेक मराठी अभिनेत्रींना विवाह बंधनात अडकलेले सर्वांनी पाहिले आहे. या मध्ये नेहा पेंडसे, सई लोकूर, शर्मिष्ठा राऊत, अर्चना निपाणकर, अभिज्ञा भावे, मिताली मयेकर यांचा समावेश होता. आता एका अभिनेत्रीचे हनिमूनचे फोटोज् सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहेत.

बिग बॉस मराठी या शो मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ही सध्या तिच्या फोटोज् वरून खूप चर्चेत आहे. शर्मिष्ठाचा विवाह 11 ऑक्टोबर 2020 रोजी पार पडला होता. त्यावेळी देखील शर्मिष्ठाच्या लग्न सोहळ्याचे अनेक फोटोज् आणि व्हिडिओज व्हायरल झाले होते.
शर्मिष्ठाचे लग्न तेजस देसाई या व्यक्ती सोबत झाले होते. शर्मिष्ठा व तेजस आता हनिमून साठी परदेशात म्हणजेच मालदीव येथे गेले आहेत. शर्मिष्ठाची एक फोटो तर जास्तच व्हायरल होत असून त्यात ती खूपच हॉट दिसत आहे. या फोटोला अनेक कलाकारांनी देखील कमेंट केलेले दिसून आले आहे.
मालदीव या देशाला निसर्गाची देण असल्याने शर्मिष्ठा व तेजस हे तेथील सर्वच ठिकाणांचा आनंद घेताना दिसून येत आहेत. शर्मिष्ठा तिकडे गेल्यापासून नेहमीच सोशल मीडियावर अपडेट करताना दिसून येत आहे. समुद्र किनाऱ्यावरील दोघांच्या फोटोज् देखील तिच्या अकाउंट ला दिसून येत आहेत.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका