झी मराठी वाहिनीवर सध्या टॉपला असणारी मालिका माझा होशील ना? सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील सई-आदित्य ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. अजूनही मालिकेत आदित्य आणि सई यांच्या प्रेमाची सुरुवात झाली नसली तरी आदित्य खऱ्या आयुष्यात मात्र एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे.
“माझा होशील ना?” मालिकेत आदित्यची भूमिका साकारत असलेल्या विराजस कुलकर्णी हा अभिनेता साकारत आहे. सध्या सर्वत्र विराजसच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमाबद्दल चर्चा होताना दिसून येत आहे. विराजस हा लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे हीच्या प्रेमात असल्याचे समजते.
विराजस व शिवानी गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे देखील ऐकण्यात येत आहे. या दोघांनी 15 फेब्रुवारी 2020 रोजी इंस्टाग्राम वर एक पोस्ट करून प्रेमाची कबूली दिली होती. तसेच, अनेकदा दोघांनी एकत्र असलेली फोटो देखील शेयर केली आहे. विराजस आणि शिवानी रांगोळे यांची ओळख डावीकडून चौथी बिल्डिंग या नाटका दरम्यान झाली होती.
मालिकेत प्रेमासाठी संभ्रमात असलेला विराजस खऱ्या आयुष्यात मात्र शिवानी बद्दल अनेकदा सोशल मीडियावर बोलून दाखविला आहे. एका नेटकऱ्याने शिवानी बद्दल अपशब्द वापरल्यास विराजस ने त्याला रागाविले देखील होते. शिवानी सध्या स्टार प्रवाह वरील “सांग तू आहेस का” मालिकेत दिसून येत आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.