गेल्या 10-12 वर्षांपासून मराठी चित्रपट सृष्टीला सोनेरी दिवस येऊ लागले आहेत. या काळात असे अनेक चित्रपट येऊन गेले, ज्यांनी करोडोंचा गल्ला जमविला. त्यातीलच एक गाजलेला चित्रपट म्हणजेच “टाईमपास” हा होय. आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Timepass 3 actress name


रवी जाधव दिग्दर्शित पहिल्या “टाईमपास”(2014) ने प्रेक्षकांना भुरळ घातली. या चित्रपटात प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर यांच्या प्रेमकहाणी ने युवा पिढीला वेड लावून सोडलं होते. परंतु ही प्रेमकहाणी अपूरी राहिली. त्यानंतर “टाईमपास 2” हा चित्रपट प्रदर्शित झाला व त्या ही चित्रपटाने यश मिळविले.

Timepass 3 actress name

टाईमपास 2 या चित्रपटात प्रियदर्शन जाधव व प्रिया बापट यांची जोडी दिसून आली. आता सर्वत्र टाईमपास 3 चित्रपट येणार असल्याची चर्चा होवू लागली आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री म्हणून लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री ऋता दुर्गुळे दिसणार असल्याचे समजते. याबद्दल स्वतः ऋताने 3 बोटे दाखवीत अप्रत्यक्षरीत्या एका पोस्ट मधून सांगितले आहे.

 

तसेच ऋता ने टाईमपास चित्रपटात पल्लवी हे नाव असल्याचे कॅप्शन मध्ये लिहिले होते. काल रवी जाधव यांनी देखील ऋता दूर्गुळे व गायिका आर्या आंबेकर सोबत एक सेल्फी काढलेला दिसून आले. फुलपाखरू, दूर्वा या मालिकेतून लोकप्रियता मिळविणारी ऋता मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास नक्कीच आनंदी असणार.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका..


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.