गेल्या काही वर्षापासून झी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळेच झी मराठीच्या सर्व मालिका टीआरपीच्या बाबतीत पुढे असायच्या. परंतु आता झी मराठीच्या मालिकाना मागे टाकत स्टार प्रवाह वरील मालिकांनी टीआरपी मद्ये आघाडी मिळविली असल्याचे दिसून येत आहे. झी मराठीची एकही मालिका टॉप 5 मध्ये नाही.

ही आकडेवारी 2020 च्या शेवटच्या आठवड्यातील असून झी मराठीच्या मालिकांनी साफ निराशा केली असल्याचे दिसून येते. प्रसारण प्रेक्षक संशोधन परिषदेने दिलेल्या माहिती नुसार त्या आठवड्यात स्टार प्रवाह वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार ही मालिका 5 व्या क्रमांकावर असल्याचे सांगितले.

तसेच, स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजेच नक्की काय असते’ या लोकप्रिय मालिकेचा महा एपिसोड प्रसारित करण्यात आला होता. या महा एपिसोडमुळे या मालिकेला टीआरपी मध्ये चौथे स्थान मिळाले आहे. तसेच स्टार प्रवाह वाहिनीची ‘फुलाला सुगंध मातीचा” या मालिकेने शेवटच्या आठवड्यात तिसरा क्रमांक पटकविला आहे.
गेल्या वर्षीच्या शेवटच्या आठवड्यात टीआरपी मध्ये दुसऱ्या क्रमांकावर स्टार प्रवाहची “मुलगी झाली हो” ही मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. या आकडेवारीत स्टार प्रवाहच्या “रंग माझा वेगळा” या मालिकेने अव्वल क्रमांक पटकाविला असून कार्तिक व दिपाच्या प्रेमाला प्रेक्षकांनी पसंती दिल्याचे दिसून येते.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका