काल दिवसभरात काही कलाकारांच्या लग्नाच्या बातम्या सर्वत्र ऐकायला मिळाल्या. एकीकडे मराठी जोडी सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर तर दुसरीकडे बॉलिवुड अभिनेता वरुण धवनच्या लग्नाच्या बातम्या सर्वत्र व्हायरल होताना दिसल्या. त्यामुळे नवदाम्पत्याच्या फोटोज् पाहण्यासाठी सर्व फॅन्स उत्सुक दिसून येत आहेत.

अभिनेता वरुण धवन व नताशा यांचे लग्न 24 जानेवारी रोजी दुपारी 12.45 रोजी होणार होते. परंतु आदल्या रात्री उशिरापर्यंत डान्स पार्टी करण्यात आल्याने लग्न वेळेवर लागू शकले नाही. बा त्यामुळे हे लग्न संध्याकाळी 7 च्या सुमारास करण्यात आले. नंतर स्वतः वरुण धवनने पोस्ट करून फॅन्स ना लग्न झाल्याचे कळविले.
वरुण व नताशाचा विवाहसोहळा अलिबाग मधील द मेंशन हाऊस या आलिशान रिसॉर्ट मध्ये पार पडला. या लग्नाला कोणालाच मोबाईल व कॅमेरा नेण्यास परवानगी नव्हती. मिडीयावाले देखील सकाळपासूनच वरुण- नताशाच्या फोटो साठी वाट पाहत होते. अखेर नवीन जोडीने हॉटेल बाहेर येऊन सर्वांचे आभार मानले.
नताशा दलाल हीचा अभिनय क्षेत्राशी काही संबंध नसल्याने ती नेहमीच मीडियासमोर येण्यास लाजत असते. ज्यावेळी दोघेजण हॉटेल बाहेर आले त्यावेळी मीडिया वाल्यांनी एकच गोंधळ करायला सुरुवात केली. त्यावेळी वरुण ने सर्वांना बजावत म्हटला, “शांत रहा, माझी बायको घाबरत आहे.”
तसे तर वरुण धवन नेहमीच नताशाची काळजी घेताना दिसत असतो. बालपणीच्या मैत्रिणीसोबत लग्न केल्याने वरुणच्या प्रेमाची सर्वत्रच प्रशंसा होताना दिसून येत आहे. दोघांच्या लग्नाला करण जोहर, मनीष मल्होत्रा असे काही मोजकेच सेलिब्रिटी उपस्थित होते. या दोघांची रिसेप्शन पार्टी 2 फेब्रुवारीला होणार असून यावेळी सर्वच कलाकार उपस्थित राहू शकतील.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका