गेल्या काही महिन्यांपासून पासून भारतीय सेलिब्रिटींच्या घरात बाळाच्या आगमनाच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. त्यात विरुष्का, सैफिना, हार्दिक-नताशा यांचा समावेश होता. काल दिनांक 11 जानेवारी रोजी विराट कोहली अनुष्का शर्मा यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे.

भारताचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या बाळाची आतुरता सर्व भारतीयांना गेल्या काही महिन्यांपासून लागून राहिली होती. विराट कोहलीने देखील अनुष्काच्या प्रसूती साठी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट दौरा सोडून वापस आला होता.

काल विराट ने स्वतः पोस्ट करून करून त्याला कन्या रत्न प्राप्त झाल्याचे सांगितले होते. परंतु, या बरोबरच त्याने आम्हाला थोडीशी प्रायव्हसी(गोपनीयता) हवी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे विरुष्काच्या मुलीची फोटो सध्या तरी कोणाला पाहायला मिळणार नाही असे वाटले. परंतु विराटचा भाऊ विकास कोहली ने केलेल्या पोस्ट मुळे अनेकांनी गैरसमज करून घेतला.
विकास कोहली याने एका बाळाच्या पायाची फोटो पोस्ट केली. अनेकांनी ही फोटो विरुष्काच्या मुलीची असल्याचे म्हटले होते. परंतु विकास ने स्वतः पोस्ट करून सांगितले की ही फोटो एक साधारण फोटो असून अनेक मीडिया वाल्यांनी याबद्दल चुकीची माहिती दिली असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेले सर्व फोटोज् खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा व शेयर करायला विसरू नका.