सध्या झी मराठी काही जुन्या मालिका संपवून नवीन मालिका सुरू होताना दिसून येत आहेत. चॅनेलचा कमी झालेला टीआरपी पाहता इतके बदल करणे गरजेचे होते. अशातच झी मराठी वाहिनीवर अग्गबाई सासूबाई ही मालिका नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसणार आहे.

Achanak sasubai latest


अग्गबाई सासूबाई ही मालिका जेंव्हापासून सुरू झाली तेंव्हापासूनच चर्चेचा विषय ठरत आली आहे. खासकरून, मालिकेतील आसावरी, बबड्या यांच्यावर तर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला. मालिकेतील शुभ्राला म्हणजेच तेजश्री प्रधानला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. परंतु आता मालिकेत शुभ्रा व सोहम(बबड्या) बदललेले दिसून येणार आहेत.

मालिकेत शुभ्राच्या भूमिकेत यापुढे उमा हृषिकेश पेंढारकर ही अभिनेत्री असणार हे सर्वांनीच प्रोमो मध्ये पाहिले. परंतु सोहम देखील बदलणार का हा प्रश्न सर्वांना पडला होता. हो, सोहम देखील बदलणार असून नवीन सोहमच्या भूमिकेत अद्वेत दादरकर हा दिसून येणार आहे. अद्वैत हा माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत सौमित्रच्या भूमिकेत दिसून आला होता.

Achanak sasubai latest

या 2 महत्वपूर्ण पात्रांच्या बदलाप्रमानेच मालिकेचे नाव देखील बदलण्यात आले असून आता “अग्गबाई सूनबाई” हे नवीन नाव असणार आहे. तसेच, मालिकेत यापुढे आसावरीला एक मोठी बिसनेसमन दाखविण्यात येणार आहे. झी मराठी मध्ये होणारे बदल हे उतरलेला टिआरपी वाढवू शकतील, असाच अंदाज वर्तविला जात आहे.

Achanak sasubai latest

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *