Aditya marriage news

सध्या सर्वत्र “व्हॅलेंटाईन आठवडा” साजरा करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेम वीरांसाठी हा एक प्रकारे उत्सवच असतो. झी मराठीची लोकप्रिय मालिका “माझा होशील ना?” या मालिकेत देखील सई आदित्यच्या प्रेमाचा रंग फुलून आलेला दिसून येत आहे.

Aditya marriage news


मालिकेत आता सई आदित्यच्या लग्नाची धुमधाम पाहायला मिळणार आहे. इतके दिवस या दोघांच्या प्रेमात सुयश या मुलाचा अडथळा पाहायला मिळाला होता. सुयशचा जबरदस्तीने सई सोबत लग्न करण्याचा प्लॅन पूर्णपणे फसलेला दिसून आला व लग्न होण्यापूर्वीच सई ने आदित्यासोबत पळ काढलेले दिसून आले.

आता आदित्य व सई यांचा विवाह सोहळा येत्या 14 फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे दिवशी पार पडलेला दिसून येणार आहे. हा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार असून लग्नाची काही व्हिडिओ देखील समोर आली आहेत. त्यातच दोघांचा मंगळआष्टिका वेळीचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

सई व आदित्य यांच्या प्रेम कहाणीला प्रेक्षकांकडून खूपच प्रेम मिळाले. सुयशच्या मालिकेत येण्याने आदित्य व सई मध्ये काही काळ दुरावा पाहायला मिळाला होता. परंतु आता परत एकदा दोघांना एकत्र आलेले पाहायला मिळणार आहे. या दोघांचा लग्न सोहळा पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

माहिती कशी कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *