झी मराठी वाहिनीवर सध्या टॉपला असणारी मालिका माझा होशील ना? सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील सई-आदित्य ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मालिकेत आदित्य आणि सई यांची लगीनसराई सुरुवात झाली आहे. परंतु आदित्य खऱ्या आयुष्यात मात्र एका अभिनेत्रीच्या प्रेमात आहे.

Aditya real wife name
Credit: Sane shashank


“माझा होशील ना?” मालिकेत आदित्यची भूमिका विराजस कुलकर्णी हा अभिनेता साकारत आहे. मालिकेत येत्या 14 फेब्रुवारीला सई आदित्यचा लग्न सोहळा प्रसारित होणार आहे. मात्र विराजस खऱ्या आयुष्यात मात्र लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे हीला डेट करीत असून हे दोघे येणाऱ्या काळात लग्न देखील करणार असल्याचे समजते.

Aditya real wife name

विराजस व शिवानी गेल्या काही वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात करत असल्याचे देखील ऐकण्यात येत आहे. या दोघांनी 14 फेब्रुवारी 2020 रोजी इंस्टाग्राम वर एक पोस्ट करून प्रेमाची कबूली दिली होती. तसेच, अनेकदा दोघांनी एकत्र असलेली फोटो देखील शेयर केली आहे. विराजस आणि शिवानी रांगोळे यांची ओळख ‘डावीकडून चौथी बिल्डिंग’ या नाटका दरम्यान झाली होती.

Aditya real wife name

मालिकेत अनेकदा प्रेमासाठी संभ्रमात असलेला विराजस खऱ्या आयुष्यात मात्र शिवानी बद्दल स्पष्टपणे प्रेम व्यक्त करताना दिसला आहे. एका नेटकऱ्याने शिवानी बद्दल अपशब्द वापरल्यास विराजस ने त्याला रागाविले देखील होते. शिवानी सध्या स्टार प्रवाह वरील “सांग तू आहेस का” मालिकेत दिसून येत आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.