तुझ्यात जीव रंगला या मालिकेला संपून 1 महिना उलटला असला तरी या मालिकेला प्रेक्षकांनी आणखीन विसरले नसावे. गेली 4 वर्ष या मालिकेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षकांचे प्रेम मिळविले. या मालिकेतून सर्वांच्या पसंतीस उतरलेल्या अंजलीबाई म्हणजेच अक्षया देवधर आता काय करतेय ते पाहुयात.

Akshata deodhar exercise video


अक्षया देवधर ही गेली 4 वर्ष सतत शूटिंग मध्ये व्यस्त होती. या कारणाने तिला स्वतःच्या फिटनेस कडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. गेली काही दिवस शूटिंग पासून दूर असल्याने अक्षया फिटनेस वर भर देताना दिसून येत आहे. तिचे व्यायाम करतानाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत.

“माझे फॅमिली बॅकग्राऊंड मुळात जिमनॅस्टिकचे असल्याने मी अगोदर कायम मागे व्यायाम करीत होते. परंतु मालिका सुरू झाल्यानंतर वेळे अभावी हे सगळं बंद झालं. परंतु, आता ते सगळं भरून काढायचं आहे. म्हणून हा प्रवास सुरू केला आहे. परंतु माझ्यात किती बदल व्हावा, असे मी काही ठरविले नाही.” असे अक्षयाने सांगितले.

आपल्या सौंदर्याने युवा पिढीवर वर छाप पाडणारी अक्षया सध्या अनुज शेळके या प्रोफेशनल ट्रेनर कडून ट्रेनिंग घेताना दिसत आहे. तिने व्यायामासाठी 30 दिवसाचे चॅलेंज घेतले असल्याचे समजते. अक्षया ज्या प्रकारे अनुज शेळके अक्षयाकडून कसरती करून घेत आहे, त्यावरून तिच्या फिटनेस मध्ये चांगला बदल झालेला दिसू शकतो.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *