बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनानंतर त्याची पूर्व गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे खूप चर्चेत आली. सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे ही दुःखात बुडाली होती व तिने सुशांतला न्याय मिळावा यासाठी खूप प्रयत्न केले होते. आता सोशल मीडियावरील तिची प्रत्येक पोस्ट चर्चेचा विषय ठरत असते.
मागील काही दिवसांपासून अंकिता ही अनेक गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. या डान्स चे व्हिडिओज ती इंस्टाग्राम रील्स वर पोस्ट करीत असते. 2 दिवसांपूर्वी तिचा शाहरुख – दीपिकाच्या तितली गाण्यवरील डान्स व्हिडिओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.
आता अंकिता लोखंडे हीचा “बेटा” चित्रपटातील “धक धक करने लगा” या गाण्यावरील डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पिवळ्या साडीवर केलेल्या या डान्स व्हिडिओ मध्ये अंकिता खूप सुंदर दिसत होती. “कलाकार हे कलाकारच असतात, मग ते छोट्या पडद्यावर भूमिका साकारत असतील, किंव्हा मोठ्या पडद्यावर किंव्हा मग ते इंस्टाग्राम रील्स वर असतील” असे कॅप्शन अंकिताने पोस्ट केले.
हा डान्स तिने तिची आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला समर्पित केला. “मी तुमची कायम फॅन राहील” असे देखील अंकिताने माधुरी बद्दल लिहिले. मागेही एकदा अंकिताला तिच्या वाढदिवशी तुला काय हवे असे विचारले असता, “मला माधुरी दीक्षित बनायचे आहे”, असे तिने उत्तर दिले होते. या डान्स मुळे अंकिता परत एकदा चर्चेत आली आहे, हे नक्की.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका