Ayesha Arif suicide news

गेल्या काही महिन्यांपासून आत्महत्येच्या अनेक घटना ऐकायला मिळाल्या. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एका मुलीने वडिलांना कर्जाचा बोजा होवू नये एका मुलीने स्वतःची जीवनयात्रा संपवली होती. आता अशीच एक घटना गुजरातच्या अहमदाबाद शहरातून समोर आली आहे.

Ayesha Arif suicide news

 


सध्या सोशल मीडियावर वर एका विवाहित मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आयेशा नामक मुलीचा असून ती व्हिडिओत आत्महत्या करीत असल्याचे सांगताना दिसली. “मी जे पण काही करीत आहे, ते माझ्या मर्जीने करीत आहे. यामध्ये कोणाचा माझ्यावर दबाव नाही. असे समजा की खुदाचे जीवन इतकेच होते”.

 

पुढे आयेशा म्हणाली, “डियर डॅड, कुठपर्यंत आपल्याच व्यक्तींसोबत लढणार आहात. आयेशा लढण्यासाठी नाही बनली. मी आरिफ वर प्रेम करते, त्याला स्वातंत्र्य हवे तर ठीक आहे तो स्वतंत्र राहावे. माझे जीवन तर इथपर्यंतच आहे, मी खुश आहे की आता लवकरच माझी भेट अल्लाह सोबत होईल.”

चेहऱ्यावर हसू ठेवून दुःख लपवीत आयशाने 25 फेब्रुवारी रोजी साबरमती नदीत उडी मारून स्वतःचे आयुष्य संपविले. या आत्महत्या मागे एक धक्कादायक कारण समोर आले आहे. आयशाचे 2 वर्षापूर्वी आरिफ नामक मुलासोबत लग्न झाले होते. लग्नावेळी हुंडा देऊन देखील आरिफ आयेशावर अत्याचार करीत परत पैशाची मागणी करीत होता. याबद्दल आयेशाच्या वडिलांनी आरिफ वर गुन्हा दाखल केला आहे.

Ayesha Arif suicide news

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *