झी मराठी वाहिनीवरील प्रत्येक मालिकेत नेहमीच छोटे मोठे बदल झालेले पाहायला मिळत असतात. काही बदल प्रेक्षकवर्ग स्वीकार करतात, तर काही बदलाना प्रेक्षकांकडून नापसंती मिळते. त्यातच आता देवमाणूस या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्रीचे आगमन होताना दिसणार आहे.

सध्याच्या मालिकांपैकी देवमाणूस ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या मालिकेत काही थरारक गोष्टी दाखविण्यात आल्या. त्यातच मालिकेतील महत्वपूर्ण पात्र मंजुळाची हत्या दाखविल्याने ते पात्र बंद झाले आहे. आता मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री नेहा खान हिचे आगमन झालेले पाहायला मिळणार आहे.तसेच ती युवा डान्सिंग क्वीन या शो मध्ये आपल्या डान्स चे जलवे दाखविताना देखील दिसून आली आहे.
देवमाणूस मालिकेत अजितकुमार या बोगस डॉक्टरला अनेकांच्या हत्या केलेल्या दाखविण्यात आल्या. मंजुळाच्या हत्येनंतर पोलिसांचा अजितकुमार वरील संशय आणखीन वाढला आहे. आता शहरातून एक मुलगी गावात आलेली एका नवीन प्रोमो मध्ये दाखविण्यात आले आहे. नेहा खान याच पात्राला साकारणार असून तिचा मालिकेत काय रोल असणार हे पाहणे मनोरंजक ठरेल.
नेहा खान हीने यापूर्वी मराठी सोबतच काही हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. आपल्या बोल्ड अदानी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या या अभिनेत्री ने शिकारी, ऊवा, घायल-2 अशा काही चित्रपटातून प्रभाव पाडला होता. आता नेहा देवमाणूस कोणत्या भूमिकेत दिसेल हे लवकरच कळेल.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.