कोरोना नंतर भारतीय खेळाडूंच्या क्रिकेटला खेळण्याला आयपीएलच्या स्पर्धेपासूनच सुरुवात झाली होती. इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीज मुळे क्रिकेट परत एकदा भारतात सुरू झाले. त्यातच आज आयपीएल 2021 स्पर्धेचा लिलाव चेन्नई येथे पार पडला. यात काही सेलिब्रिटी व सेलिब्रिटींची मुले पाहायला मिळाली.
आयपीएल स्पर्धेतील काही संघाचा मालकी हक्क हा बॉलिवुड कलाकारांनी मिळवला असल्याने स्पर्धे दरम्यान नेहमीच हे कलाकार दिसून येत असतात. यामध्ये प्रीती झिंटा, शाहरुख खान, जूही चावला, शिल्पा शेट्टी अशा कलाकारांचा समावेश आहे. आज लिलावात शाहरुख खानचा मुलगा आर्यन सोबत एक मुलगी देखील दिसून येत होती.

कोलकत्ता संघाच्या ओनर लिस्ट मध्ये शाहरुख खान सोबतच जूही चावला हीचा देखील एक शेयर आहे. त्यामुळे आज लिलावात तीचे पती जय मेहता सोबतच मुलगी जाहनवी ही देखील उपस्थित होती. जाहनवी हिला गेल्या वर्षी देखील आयपीएलच्या लिलावात सर्वांनी पाहिलं होते.
जाहनवी ही आयपीएल ऑक्शनच्या इतिहासातील सर्वात तरुण व्यक्ती ठरली आहे. ती फक्त 20 वर्षाची असून तिला अर्जुन मेहता नामक एक भाऊ देखील आहे. 90 दशकात आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या जूही चावला हीने 1990 मध्ये उद्योजक जय मेहता यांच्यासोबत विवाह केला होता. आज लिलावात जय मेहता देखील उपस्थित होते.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका