गेल्या महिनाभरात काही सेलिब्रिटींच्या घरात बाळाचा जन्म झालेला आपल्याला ऐकायला मिळाले. विराट-अनुष्का, बबिता फोगट, मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्या घरी चिमुकल्यांचे आगमन झाले. आता आणखीन एका कलाकाराच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे.

काही दिवसांपूर्वी बातमी प्रसारित करण्यात आली होती की लोकप्रिय विनोदी अभिनेता कपिल शर्मा याने त्याची पत्नी दुसऱ्यांदा बाळाला जन्म देणार आहे. त्या कारणाने कपिल शर्मा याने काही दिवस शूटिंग बंद करण्याचा निर्णय देखील घेतला होता. आता आज सकाळीच त्याच्या घरी नवीन बाळाचे आगमन झाले आहे.
कपिल शर्मा याचे 12 डिसेंबर 2018 रोजी गिन्नी चतरथ या मुलीसोबत लग्न झाले होते. 10 डिसेंबर 2019 रोजी या जोडीला कन्यारत्न प्राप्त झाले होते. 1 वर्षातच मुलीचे पालक झाल्यानंतर दोघांना 14 महिन्यातच दोघांना मुलगा झाला आहे.आज सकाळी स्वतः कपिल शर्मा ने ट्विट करून फॅन्सला माहिती दिली आहे.
“नमस्कार, आम्हाला आज सकाळी एका लहान मुलाच्या रूपाने आशीर्वाद मिळाला आहे. देवाच्या कृपेने आई आणि बाळ दोघेही ठीक आहेत. तुमच्या सर्वांच्या प्रेम, प्रार्थना, आशीर्वादाबद्दल धन्यवाद” असे ट्विट करीत कपिल ने आनंदाची बातमी दिली आहे. आता कपिल नंतर लवकरच करीना व सैफ अली खान हे देखील दुसऱ्या बाळाचे आई वडील होतील.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.