गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. कायदा व न्यायव्यवस्था कितीही कडक असली तरीही गुन्हे कमी होण्याचे नाव घेत नाहीत. अशातच आता कारभारी लयभारी या टिव्ही मालिकेतील एका अभिनेत्री चक्क भर रस्त्यात मारहाण झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे.
झी मराठी वाहिनीवर सध्या सुरू असलेली कारभारी लयभारी या मालिकेत सुरुवातीच्या काही भागात शोना मॅडम व तिची सोबती गंगा दिसून आली होती. आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या गंगाला एका भयानक अनुभवाचा सामना करावा लागला आहे. गंगा ने स्वतः व्हिडिओ द्वारे ही माहिती देताना खूप घाबरलेल्या अवस्थेत दिसून आली.
गंगाच्या म्हणण्यानुसार ती मुंबईतील एका बस स्टॉप वर बसची वाट पाहत होती. तितक्यात काही मुलांनी विनाकारण तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती घाबरून गेली व तिथून ऑटो मध्ये घराकडे निघाली. वाटेत ऑटो मध्येच तिने लाईव्ह येऊन घाबरलेल्या अवस्थेत पुढे काय करू अशी फॅन्सकडे विचारणा केली.
खूप कमी लोकांना माहिती आहे की, गंगा ही तृतीयपंथी असून तिचे खरे नाव प्रणित हाटे आहे. तृतीयपंथी असल्याने तिला लहानपणापासून अगोदरच खूप त्रास सहन करावा लागला होता. आता देखील ती परत याच समस्यांचा सामना करताना दिसून येत आहे. तिचा व्हिडिओ पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करताना दिसून येत आहेत. गंगाला योग्य न्याय मिळायला हवा, असे सर्वजण मागणी करीत आहेत.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका