गेल्या काही महिन्यांपासून काही भारतीय सेलिब्रिटींच्या घरात बाळाच्या बाळाच्या आगमनाच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. विराट-अनुष्का, बबिता फोगाट, हार्दिक पांड्या-नताशा यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाल्या नंतर आता सैफ अली खान व करीना कपूर यांच्या घरी आणखीन एक पाहुणा जन्माला येणार आहे.
बॉलिवुड मध्ये “बेबो” म्हणून लोकप्रिय असणाऱ्या करीना कपूरच्या गरोदरपणाच्या बातम्या सोशल मीडियावर ऐकायला मिळत आहेत. सैफ व करीना यांना यापूर्वी तैमूर नावाचा एक मुलगा देखील आहे. आता हे दोघे दुसऱ्या बाळाची बातमी येणाऱ्या काही दिवसातच फॅन्स ला देताना दिसतील.
करीना तिच्या बेबी बंप सोबतच्या अनेक फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत असते. आता करीनाच्या गरोदरपणाचे 9 महिने पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने करीनाचे फोटोशूट करतानाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत.
“9 महिने झाले आणि मी आणखीन जास्त मजबूत होत आहे” असे कॅप्शन टाकत करीना व्हिडिओ पोस्ट केला आहे. पहिल्या गरोदरप्रमाणेच करीना यावेळी देखील जाड झालेली दिसून येत आहे. त्यामुळे तैमूर प्रमाणेच होणारे बाळ देखील मजबूत होणार असे दिसते. येत्या आठवडाभरात करीना बाळाची गोड बातमी शेयर करताना दिसू शकते.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका