गेल्या काही महिन्यांपासून काही भारतीय सेलिब्रिटींच्या घरात बाळाच्या बाळाच्या आगमनाच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. विराट-अनुष्का, बबिता फोगाट, हार्दिक पांड्या-नताशा यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाल्या नंतर सैफ अली खान व करीना कपूर यांच्या घरातून देखील बाळाच्या आगमनाची बातमी ऐकायला फॅन्स उत्सुक होते.

बॉलिवुड मध्ये “बेबो” म्हणून लोकप्रिय असणाऱ्या करीना कपूरच्या गरोदरपणाच्या बातम्या गेल्या 3-4 महिन्यापासून सोशल मीडियावर ऐकायला मिळत होत्या. गरोदर राहिल्यानंतर देखील करीना सोशल मीडियावर अक्टिव राहून स्वतःचे फोटोज् पोस्ट करताना दिसून आली. आता करीना सैफ यांच्या बाळासोबतच्या काही फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहेत.
अनेकांनी या फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट करून सैफीनाच्या घरी बाळाचे आगमन झाल्याची बातमी दिली. परंतु या सर्व अफवा असून त्या व्हायरल झालेल्या फोटोज् तैमुरच्या जन्मावेळीच्या आहेत. तिची येणाऱ्या काही वेळात कधीही प्रसूती होवू शकते.
समोर आलेल्या फोटोज नुसार करीना प्रसूती साठीच दवाखान्यात दाखल झाली आहे. तसेच एका फोटो मध्ये सैफ आली खान स्वतः खेळणी घेऊन दवाखान्यात गेल्याचे दिसून आले. करीनाची प्रसुतीची तारीख येऊन गेली असल्याने ती कधीही बाळाला जन्म देऊ शकते.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका