मराठी चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट नृत्यांगना व अभिनेत्री मानसी नाईक तिचा काही दिवसांपूर्वी लग्न सोहळा आटोपला होता. मानसीचा विवाह 19 जानेवारी 2021 रोजी प्रदीप खरेरा या व्यक्तीसोबत झाला होता. मानसी व प्रदिपच्या लग्न सोहळ्याची सोशल मीडियावर खूप चर्चा देखील झाली होती.

Mansi naik latest news


मराठी चित्रपट सृष्टीत एका पेक्षा एक हिट गाणी देणाऱ्या मानसीने ज्या प्रदीप खरेरा सोबत लग्न केले आहे तो एक आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे. हे दोघे लग्नापूर्वी बरेच महिने एकमेकांच्या प्रेमात होते. त्याच प्रेमाचे रूपांतर काही दिवसांपूर्वी त्यांनी नात्यात केले. लग्नानंतर मानसीने तिच्या सासरवाडीतील प्रदीप सोबतचा शेतातील काही फोटोज् देखील पोस्ट केले होते.

 

आज मानसीचा वाढदिवस असून दिवसाच्या सुरुवातीलाच मानसीने एक रोमँटिक व्हिडिओ शेयर केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना मानसीने कॅप्शन मध्ये “सकाळी असे उठलो” असे लिहिले. दोघे या व्हिडिओत एकमेकांच्या खूप जवळ असलेले पाहायला मिळत आहेत. फॅन्स कडून देखील या व्हिडिओला चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत.

मानसीची सासरवाडी हरियाणा राज्यातील असून तेथील रीतिरिवाजाप्रमाने अनेक कार्यक्रम करताना दिसून येत आहे. त्याप्रमाणे मानसी ने एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यात ती तिच्या दिरांसोबत काटीने एकमेकांना मारलेला खेळ खेळताना दिसून आली. मिस्टर व मिसेस खरेरा यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.