मराठी चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट नृत्यांगना व अभिनेत्री मानसी नाईक ही गेल्या महिन्यात
लग्नबंधनात अडकली होती. मानसीचा विवाह 19 जानेवारी 2021 रोजी प्रदीप खरेरा या व्यक्तीसोबत झाला होता. दोघांच्या साखरपुड्यापासून ते लग्न सोहळ्यापर्यंत सोशल मीडियावर खूप चर्चा झालेली पाहायला मिळाली.
मराठी चित्रपट सृष्टीत एका पेक्षा एक हिट गाणी देणाऱ्या मानसीने ज्या प्रदीप खरेरा सोबत लग्न केले आहे तो एक आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे. हे दोघे लग्नापूर्वी बरेच महिने एकमेकांच्या प्रेमात असल्याचे दिसून आले. लग्नापूर्वी अनेकदा दोघांनी एकत्र फोटोज् पोस्ट केलेले दिसून आले. मानसी लग्नानंतर तर सोशल मीडियावर जास्तच ॲक्टिव पाहायला मिळत आहे.
लग्न झाल्यापासून मानसी ने प्रदीप सोबतच्या अनेक फोटोज् आणि व्हिडिओज शेयर केले होते. मानसीने प्रदीपला एक चॅलेंज दिले व त्याचा व्हिडिओ देखील तिने पोस्ट केला. या व्हिडिओत तिने दिलेले चॅलेंज प्रदिपला पूर्ण करता आले नाही व तो समोर पडलेला दिसून आला.
या प्रेमळ व्हिडिओला फॅन्स कडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या दिसून येत आहेत. मात्र यातून मानसी व प्रदीप यांच्या प्रेम किती बहरलेले आहे हे दिसून येत आहे. यापूर्वी मानसी प्रदीप सोबत काही रोमँटिक व्हिडिओ पोस्ट केलेले दिसून आली होती.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका