अभिनय क्षेत्रात कलाकारांनी संपूर्ण वेळ शूटिंगला देऊन जर वेळेवर मानधन मिळत नसेल तर त्यांना राग येणे साहजिकच आहे. आता एका मालिकेतील काही कलाकारांना पेमेंट वेळेवर मिळाली नसल्याने त्यांनी चक्क पोस्ट करून आवाज उठविला आहे. यामध्ये मृणाल दुसानीस, शर्मिष्ठा राऊत, विधी शामसकर, संग्राम समेल यांची नावे आहेत.

Marathi actress news update

वरील सर्व कलाकार “मन हे बावरे” या मालिकेचे असून ही मालिका काही महिन्यांपूर्वी संपली होती. त्यांनी मालिकेचे निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे न दिल्याचे आरोप केले आहेत. “चॅनेल कोणतेही असो, निर्माता कोणीही असो आम्ही कलाकार नेहमीच आपल्याकडून चांगलं काम व्हावं या हेतूने मेहनत घेत असतो.”

“काम करूनही त्याचा पैसा वेळेवर न मिळणे, योग्य आहे का? चॅनेलने पैसे देऊन देखील ते पैसे कलाकारांना निर्मात्याकडून न मिळणे योग्य आहे का? कलर्स मराठी वाहिनीने सर्व कलाकारांना वेळोवेळी पैसे मिळवून देण्यासाठी मदत केली, परंतु निर्मात्याने मात्र कोणालाही पैसे दिले नाहीत.” असे आरोप या कलाकारांनी पोस्ट द्वारे मंदार देवस्थळी यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या केले आहेत.

Marathi actress news update


“शूटिंगचा वेळ वाया जाऊ नये म्हणून निर्मात्याच्या अडचणीच्या वेळेस आम्ही घरून स्वतःचे कॉस्टूम्स आणून मदत करणे चूक आहे का? आपलाच मेहनतीचा पैसा भिक मागितल्या सारखा सतत मागणे योग्य आहे का? असे पुढे त्यांनी पोस्ट मध्ये लिहिले. यावर मंदार देवस्थळी यांनी यावर नम्रपणे उत्तर दिले.

Marathi actress news update

 

“मला जाणीव आहे प्रत्येकालाच पैशांची गरज आहे, माझ्या कडून तुम्हा सर्वांचे पेमेंट थकले आहे. पण मी सुद्धा सध्या बिकट परिस्तिथी मधून जात आहे. मला खूप लॉस झाला असून आत्ता माझी पैसे देण्याची खरच परिस्तिथी नाही. माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास सहन करावा लागतो आहे, त्याबद्दल तुम्हाला मनापासून माफी मागतो” अशा शब्दात मंदार यांनी दिलगिरी व्यक्त केली.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *