सध्या झी मराठी वाहिनीवर जुन्या मालिका संपवून नवीन मालिका सुरू झालेल्या पाहायला मिळत आहेत. चॅनेलचा उतरलेला टीआरपी पाहता हे बदल करणे गरजेचे होते. अशातच आता परत झी मराठी वाहिनीने एक मोठा बदल केला असून चक्क मालिकेच्या नावासहित अभिनेत्री देखील बदलण्यात आली आहे.
अग्गबाई सासूबाई ही मालिका सुरू झाल्यापासून नेहमीच चर्चेचा विषय ठरत आली आहे. मालिकेतील आसावरी, बबड्या यांच्यावर तर सोशल मीडियावर मीम्सचा पडलेला पाहायला मिळाला. तसेच, सुनेला साजेल असे पात्र साकारणाऱ्या शुभ्राला म्हणजेच तेजश्री प्रधानला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. परंतु आता मालिकेत नवीन शुभ्रा पाहायला मिळणार आहे.
येत्या 15 मार्च पासून मालिकेत शुभ्राच्या भूमिकेत उमा हृषिकेश पेंढरकर ही अभिनेत्री दिसून येणारं असून नवीन प्रोमो मध्ये ती दिसून आली आहे. उमा यापूर्वी कलर्स मराठी वाहिनीवरील स्वामीनी या मालिकेत पार्वतीबाई पेशवेच्या भूमिकेत दिसून आली होती. आता ती परत नव्याने शुभ्राच्या भूमिकेत दिसून येणार आहे व शुभ्राला बाळ देखील दाखविण्यात आले आहे.
तसेच, “अग्गबाई सासूबाई” या मालिकेचे नाव देखील बदलण्यात आले असून आता “अग्गबाई सूनबाई” हे नवीन नाव असणार आहे. मात्र आसावरी एक मोठी बिझनेसमन दाखविलेली दिसणार आहे. झी मराठी मध्ये होणारे बदल हे उतरलेला टिआरपी वाढवू शकतील, असाच अंदाज वर्तविला जात आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका