4 दिवसापूर्वी पुण्यातील महमंदवाडी भागात पूजा चव्हाण नामक मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजवून सोडली आहे. कारण काही व्यक्ती पुजाची आत्महत्या नसून तिची हत्या असल्याचे संशय घेऊन या मागे बड्या नेत्याचा हात असल्याचे आरोप केले आहेत.

Pooja chavhan latest news


बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी 22 वर्षीय पूजा चव्हाण ही सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय होती. लाखो फॉलोवर्स असणारी पूजा समाजकार्यात देखील नेहमीच सक्रिय असायची. परळीतून पुण्यात जाऊन पूजाने आत्महत्या केल्याने सर्वांना धक्का बसला होता. तिच्या मृत्यूनंतर तिची बहीण दिया चव्हाण हीने एक भावनिक पोस्ट केली आहे.

Pooja chavhan latest news

“गेल्या 2 दिवसांपासून सर्वजण काहीही पोस्ट टाकत आहेत. माझी बहीण फक्त परळीची नसून ती अख्या महाराष्ट्राची वाघीण होती. पूजा इतकी कमजोर नव्हती की ती असं काही करेल आणि सर्वांना चांगलेच माहिती आहे.” अशा शब्दात दिया चव्हाण हिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

Pooja chavhan latest news

पुढे दिया ने म्हटले, “मला अजूनही विश्वास नाही की तिने आत्महत्या केली असेल. त्यामागे कोणती तरी मोठीच गोष्ट असेल. दिदीने फक्त बंजारा समाज नाही तर सर्वांना पाठिंबा दिला आहे व जितके होईल तितके सर्वांना मदत केले. मी तिची लहान बहीण आहे, हे माझं नशीब असल्याचे दिया ने पोस्ट द्वारे म्हटले.

दुसरीकडे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट महविकास आघाडीचे नेते व शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटने संदर्भात व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंग वरून पूजा कसला तरी उपचार घेत होती व पूजा आत्महत्या करणार आहे असे देखील ऐकायला मिळत आहे.

याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *