मॉडर्न जगात एखाद्याला लोकप्रिय होण्यासाठी फक्त एक रात्र पुरेशी असते. जर तुमच्याकडे टॅलेंट असेल किंव्हा जर तुम्ही काही जगावेगळे केले तर तुम्हीही लोकप्रिय होवू शकतात. अशाच प्रकारे सध्या सोशल मीडियावर एका माय लेकीचे व्हिडिओज प्रचंड वायरल होताना दिसत आहेत.


सोशल मीडियाच्या दुनियेत या मायलेकी रातोरात स्टार झाल्या असून आई प्रमाणेच मुलगी देखील सुरात गायेलेली दिसून येते. या 3 वर्षाच्या चिमुकलीने आजपर्यंत अनेक गाणी गायली असून तिचे प्रत्येक गाणी व्हायरल होत असतात. 2 वर्षाची असताना तर तिने चक्क “लग जा गले” हे गाणे गाऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

पश्चिम बंगाल येथे राहणाऱ्या या चिमुकलीचे नाव प्रज्ञा मेधा असून तिच्या आईसोबत ती गाताना दिसते. या दोघींचा 1 वर्षापूर्वीचा कबीर सिंग चित्रपटातील “तुझे कितना चाहने लगे हम” हे गाणे म्हणतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर लाखो लोकांनी पाहिले आहे.

इतक्या लहान वयात प्रज्ञाची स्मरणशक्ती व योग्य लागलेला सुर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ती फक्त बॉलिवूडचीच गाणी गात नाही तर तिला जवळपास देवांची सर्वच मंत्र पाठ आहेत. तिला इतक्या लहान वयात कसली गाणी शिकवीत आहेत, असे म्हणणाऱ्यांना ही एक चपराक आहे.

तुम्हाला या चिमुकलीचे गाणी कशी वाटले ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *