झी मराठी वाहिनीवरील प्रत्येक मालिका लोकप्रियता मिळवितच असतात. काही मालिका जास्त काळ चालून प्रेक्षकांची मन जिंकतात तर काही मालिका कमी वेळच चालतात पण प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करतात. त्यामुळे प्रेक्षक अशा मालिकांना परत दाखविण्याची मागणी करतात.

Ratri khel chale serial news


झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेपैकी रात्रीस खेळ चाले व तुला पाहते रे या मालिकांनी टिआरपीची शिखरे गाठली. त्यामुळे या दोन्ही मालिकेच्या फॅन्सनी परत या मालिका सुरू करण्याची मागणी केली. प्रेक्षकांची आवड पाहता आता झी मराठीची लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चाले परत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ratris khel chale season 2

या मालिकेला इतकी लोकप्रियता मिळाली की या मालिकेचे यापूर्वी 2 सीझन येऊन गेले आहेत. हे दोन्ही सीझन खूप कमी वेळ चालले. मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, पांडू, छाया, दत्ता या पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. याच कारणाने या मालिकेला परत एकदा दाखविण्याचा निर्णय घ्यावा लागला.

आता रात्रीस खेळ चाले -3 ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचे टिझर देखील प्रदर्शित झाले आहे. मालिकेच्या या येणाऱ्या पर्वात देखील अण्णा नाईक दिसणार आहेत. तसेच, या मालिकेत शेवंता, पांडू हे पात्र देखील दिसण्याची शक्यता आहे. आवडती मालिका परत येणार असल्याने प्रेक्षकवर्ग देखील आनंदी झाले आहेत.

Ratris khel chale season 2

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.