आज व्हॅलेंटाईन दिवस असल्याने सर्वत्र प्रेमाचा बहार दिसून आला. सोशल मीडियावर देखील प्रेमी युगल व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा देताना दिसून आले. तसेच अनेक विवाहित सेलिब्रिटीनी आपापल्या जोडीदारासोबत फोटोज् व्हिडिओ पोस्ट करून व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा देताना दिसून आले.
महाराष्ट्राची लोकप्रिय जोडी रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख ही जोडी सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव दिसून येते. कोणताही प्रसंग असला तरी हे दोघे व्हिडिओ द्वारे किंव्हा फोटो द्वारे व्यक्त होताना दिसतात. यापूर्वी दोघांनी लग्नाच्या वाढदिवशी देखील सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेयर केला होता.
आता रितेशने व्हॅलेंटाईन डे दिवशी जेनेलिया सोबतचा एक रोमँटिक व्हिडिओ शेयर केला आहे. “तुम्हे अपना बनाने की कसम खायी है” या गाण्यावर रितेश ने इंस्टाग्राम रील व्हिडिओ बनविला आहे. हा व्हिडिओ रितेश ने जेनेलियाला न सांगताच बनविला दिसून येत आहे.
व्हिडिओ मधील दोघांचे प्रेम पाहून अनेकांनी या जोडप्याच्या प्रेमाचे कौतुक केले. तसेच, जेनेलिया ने देखील कमेंट मध्ये “आय लव यू” म्हटले. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही दोघांच्या प्रेमात थोडाही कमीपणा वाटत नाही. म्हणूनच जेनेलिया व रितेश या जोडीला अनेकजण आदर्श जोडी मानतात.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका