बॉलिवुडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर व पंजाबी गायक रोहनप्रीत सिंग यांचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला. या दोघांच्या लग्नाच्या सोशल मीडियावर खूप चर्चा झालेल्या पाहायला मिळाल्या. परंतु, नेहा आयुष्यात येण्यापूर्वी रोहनप्रीतने एका अभिनेत्रीला लग्नाची मागणी केली होती.

Rohan preet first love


आपल्यापेक्षा वयाने 7 वर्षाने लहान असलेल्या रोहनप्रीत सोबत लग्न केलेल्या नेहा कायम तीचे प्रेम व्यक्त करताना दिसली आहे. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करीत असल्याचे कबूल करीत असले तरी रोहनप्रीत लग्नाअगोदर लोकप्रिय अभिनेत्री शहनाज गिल हिला लग्नाची मागणी केली होती.

Rohan preet first love

बिग बॉस 13 या सीझन मधून संपूर्ण भारतात लोकप्रियता मिळविणाऱ्या शहनाज गिल हीने लगेच “मुझसे शादी करोगी” हा शो केला होता. या शो मध्ये तिला आवडेल त्या मुलासोबत लग्न करणार होती व तिला पसंद नसणाऱ्या मुलांना शो मधून बाहेर जावे लागणार होते. या शो मध्ये रोहनप्रीत व शहनाज यांच्या केमेस्ट्रीला प्रेक्षकांनी पसंती दिली होती.

 

यानंतर रोहनप्रीतला या शो मधून बाहेर काढण्यात आले होते. या निर्णयाने सर्वांना मोठा धक्का बसला होता. रोहनप्रीत व शहनाज गिल दोघेही शो मध्ये येण्यापूर्वी 3 वर्ष एकमेकांचे मित्र देखील होते. या शो नंतर काही महिन्यातच रोहनप्रीतला नेहाच्या रूपाने नवीन साथीदार मिळाली व दोघांच्या जोडीला सर्वांकडून प्रेम मिळताना दिसून येत आहे.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.