गेल्या काही काळापासून अनेक भारतीय सेलिब्रिटींच्या घरात बाळाच्या आगमनाच्या बातम्या ऐकायला भेटल्या. विराट-अनुष्का, बबिता फोगाट, हार्दिक पांड्या-नताशा यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले. तसेच मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर हिला गेल्या महिन्यात तर अभिनेता शशांक केतकर याला काही वेळेपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झाले.

गेल्या काही दिवसांपासून सैफ अली खान व करीना कपूर यांच्या घरी बाळाचे आगमन झाल्याच्या अफवा ऐकायला मिळत होत्या. परंतु आता खरोखरच त्यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे फॅन्स या आनंदाच्या बातमीसाठी उत्सुक होते व आज सकाळी ही बातमी त्यांना ऐकावयास मिळाली.
सैफ व करीना या दोघांना मुलगा झाला असल्याने तैमूर साठी छोटा भाऊ आला आहे. 2 दिवसांपुर्वीच करीना दवाखाण्यात दाखल झाली होती. त्यामुळे या दोघांच्या फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहचली होती. करीनाची नातेवाईक रिधिमा कपूर हिने अखेर ही आनंदाची बातमी शेयर केली. तरी करीनाने आणखीन कोणतीही पोस्ट केली नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार करीना व बाळ दोघेही ठणठणीत आहेत. तैमुर सैफिनाचा पहिला मुलगा सोशल मीडियावर व न्यूज चॅनेलवर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. सध्या व्हायरल होत असलेला हा फोटो नवीन बाळाचा नसून तैमूरच्या जन्मावेळीचा आहे. सैफिना लवकरच बाळाचा फोटो शेयर करण्याची शक्यता आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका