माणसाच्या चेहऱ्यावरून, राहणीमानातून व विचार सरणीमधून त्यांचा स्वभाव लगेच कळत असतो. परंतु, कधी कधी स्वतःला बाहेरून सकारात्मक दाखविणारी माणसे देखील आतून खचलेली असू शकतात. याचाच एक प्रत्यय म्हणजेच टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने केलेली आत्महत्या ही होय.


रविवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास समीर गायकवाड या 22 वर्षीय मुलाने पुण्यातील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याने एका बंद खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याचे सूत्रांकडून समजते. त्याच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर त्याच्या हजारो फॉलोवर्स श्रद्धांजलीच्या पोस्ट्स शेयर केलेल्या दिसून आल्या.

समीरने आत्महत्या का केली हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. कारण तो त्याच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये सर्वांना सकारात्मक मार्ग दाखविण्याचा प्रयत्न करायचा. परंतु लोकांच्या म्हणण्यानुसार त्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबद्दल लवकरच स्पष्ट देखील करण्यात येईल.पण आईवर जीवापाड प्रेम करणारा समीर इतक्या टोकाचा निर्णय घेईल हे कोणालाच वाटले नव्हते.

समीर गायकवाड हा सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय झाला होता व त्याने स्वतःच्या आवाजात बनविलेल्या अनेक व्हिडिओजमुळे तो युवा पिढीचे आकर्षण ठरला होता. काल सकाळीच त्याने अशी एक व्हिडिओ पोस्ट केली आणि संध्याकाळी त्यांच्या निधनाची वार्ता समजल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *