2020 या वर्षभरात बॉलिवुड मधील अनेक लोकप्रिय कलाकारांनी जगाचा निरोप घेतलेले पाहायला मिळाले. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येमुळे तर अख्खे बॉलिवुड हादरवून सोडले होते. आता तब्बल 8 महिन्यानंतर त्याच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्याने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे.
सुशांतच्या घटनेनंतर अनेक छोट्या मोठ्या कलाकारांनी आत्महत्या केल्याच्या ऐकावयास मिळाले. आता सुशांत सिंग राजपूतच्या “धोनी – द अनटोल्ड स्टोरी” या चित्रपटात सहायक अभिनेत्याची भूमिका साकारणारा अभिनेता संदीप नाहर याने काल गोरेगाव येथील राहत्या घरी आत्महत्या केली. यासोबतच संदीप ने अक्षय कुमारच्या केसरी चित्रपटात देखील दिसून आला होता.
संदीप याने काल सोशल मीडियावर एक धक्कादायक पोस्ट केल्या नंतरच हे मोठे पाऊल उचलले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये पत्नी व सासू यांच्याकडून होत असलेला मानसिक त्रास सहन होत नसल्याने जीवनयात्रा संपवित असल्याचे सांगितले. हा व्हिडिओ नंतर त्याच्या अकाऊंट वरून डिलीट झाला.
संदीपने त्याच्या व्हिडिओ मध्ये पत्नी कांचन हीने लग्न झाल्यानंतर 2 वर्षात कशा प्रक्रारे त्याचा मानसिक छळ केला हे सांगितले. “मी मेल्यानंतर कांचनला कोणी त्रास देऊ नका व तिच्या डोक्याचा उपचार करा” असे देखील सांगितले. संदीप याने सुशांतच्या निधनानंतर त्यावेळी एक व्हिडिओ पोस्ट करून दुःख व्यक्त केले होते.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.