सध्या सेलिब्रिटींच्या घरातून बाळाबाबतीत आनंदाच्या वार्ता ऐकावयास मिळत आहेत. हिंदी सोबतच काही मराठी कलाकारांच्या घरी बाळाचे आगमन झालेले दिसून आले. काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेता शशांक केतकर याने पत्नी प्रियांका गरोदर असल्याचे बातमी फॅन्स सोबत शेयर केली होती.
गेल्या महिन्यात अभिनेत्री धनश्री काडगावकर हीने मुलाला जन्म दिला होता. आता अभिनेता शशांकच्या घरी मुलाचा जन्म झाल्याची बातमी समोर आली आहे. 25 डिसेंबर रोजी म्हणजेच ख्रिसमस डे रोजी शशांकने पत्नी प्रियंका सोबत फोटो पोस्ट करताना हे एक मोठे गिफ्ट असल्याचे सांगितले होते व त्यातूनच फॅन्सना ही बातमी उघड झाली होती.
आता शशांक केतकरने स्वतः बाळासोबतची एक फोटो पोस्ट करून त्याला मुलगा झाला असल्याचे सांगितले. परंतु शशांक ने बाळाच्या चेहरा लपविला असून दुसऱ्या सेलेब्रिटी प्रमाणे काही दिवस प्रायव्हसी ठेवणार असल्याचे सांगितले. हाच फोटो त्याची पत्नी प्रियंका केतकर हीने देखील पोस्ट केला आहे.
शशांक-प्रियंकाने जन्मलेल्या बाळाचे नाव ऋग्वेद ठेवले असून दोघांनी कॅप्शनमध्ये “ऋग्वेद शशांक केतकर” असे पोस्ट केले आहे. बहुतेक या दोघांनी बाळाचे नाव अगोदरच ठरवून ठेवले असावे. एकीकडे बॉलिवुड जोडी सैफ अली खान व करीना कपूरच्या घरी बाळाची आतुरता असतानाच या मराठमोळ्या कलाकाराने ही गोड बातमी दिली.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका