झी मराठी वाहिनीवरील “माझा होशील ना?” ही मालिका सध्या खूपच लोकप्रियता मिळवित आहे. सई आदित्यच्या लग्नसोहळ्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. या मालिकेत सईच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

“माझा होशील ना?” मालिकेत सईच्या आईची भूमिका सुलेखा तळवलकर या अभिनेत्रीने साकारली आहे. 8 ऑक्टोबर 1971 रोजी जन्मलेल्या या अभिनेत्री कडे पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही की ती 49 वर्षाची आहे. सुलेखाच्या सौंदर्या बाबतीत सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडलेला पहायला मिळतो.
सुलेखा तलवलकर या दिवंगत अभिनेत्री स्मिता तलवलकर यांच्या सून असून त्यांची मुलगी देखील दिसायला खूप सुंदर आहे. सुलेखा यांच्या मुलीचे नाव टिया आहे व ती अभिनय क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात पारंगत आहे. टिया सोंदर्या बाबतीत आईवरच गेली आहे.
सुलेखा या सध्या माझा होशील ना? मालिकेत शर्मिला बिराजदार ची भूमिका साकारत असून त्या “सांग तू आहेस का?” या मालिकेत देखील दिसून येत आहेत. सुलेखा व त्यांची मुलगी टिया या दोघी एकत्र त्यांच्या यूट्यूब चॅनेल वर वेगवेगळ्या रेसिपीज बनविताना दिसून येत असतात. अभिनयाचा वारसा असून देखील टिया ने वेगळ्या क्षेत्रात करियर करायचे ठरवले आहे.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका