भारतातील सर्वात लोकप्रिय व तितकाच वादग्रस्त असलेल्या “बिग बॉस” हा शो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. या शो मध्ये येणारे प्रत्येक कलाकार वर्षानुवर्षे फॅन्सच्या लक्षात राहतात. परंतु आता बिग बॉसच्या फॅन्स साठी आता एक दुःखद बातमी समोर आली आहे.

बिग बॉसच्या 10व्या सीझन मधील सदस्य असलेल्या स्वामी ओम यांचे दुःखद निधन झाल्याची वार्ता समोर आली आहे. 63 वर्षीय स्वामी ओम ने आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी शेवटचा श्वास घेतला. स्वामी ओम यांना 3 महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोना झाल्या पासूनच त्यांची तब्येत खालावली होती.
स्वामी ओम कोरोना मधून थोडे फार ठीक होत असतानाच त्यांना 15 दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका बसला होता. तेंव्हा पासूनच त्यांची तब्येत नाजूक झाली होती व त्यांना मुंबईतील एम्स दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे अर्धांगवायूमुळेच आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बिग बॉस सीझन 10 मध्ये स्वामी ओम यांनी अन्य स्पर्धकांच्या नाकीनऊ आणून सोडले होते. एकदा तर स्वामी ओमने काही स्पर्धकांच्या अंगावर चक्क मूत्र फेकले होते. त्यामुळे त्यांना सलमान खान ने शो मधून बाहेर देखील काढले होते. त्यानंतर स्वामी ओमने सलमानला कानशिलात मारल्याचा दावा देखील केला होता.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका