तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका गेल्या 12 वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आली आहे. इतके जास्त काळ मालिका चालू राहिल्याने मालिकेत नेहमीच बदल झालेले पाहायला मिळाले. यात अनेक कलाकार बदलण्यात देखील आले होते. आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

Tarak mehta latest update


12 वर्षापासून टीआरपी मध्ये सातत्य ठेवणाऱ्या तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत आता जेठालाल अडचणीत सापडलेला दिसून येत आहे. जेठालालला टिव्ही कंपनीला देण्यासाठी 50 लाखाची गरज पडली आहे. यासाठी त्याने उधारी असलेल्या व्यक्तीकडे पैशाची मागणी केली असता त्याने खोटे बोलल्याचे दाखविण्यात आले आहे.

Tarak mehta latest update

तसेच, जेठालाल ने अय्यर व बबिताला काही औषधे देण्याचे वचन दिले होते. ते देखील ती पूर्ण करू शकत नाही. या सर्व कारणांमुळे जेठालाल आता त्याचे दुकान विकून सर्व समस्या दूर करण्याचा निर्णय घेताना प्रोमो मध्ये दिसत आहे. यातच त्याचे वडील चाचाजी व मुलगा टप्पू गोकुलधाम सोसायटी सोडण्याचा बोलताना दिसून आले.

Tarak mehta latest update
Credit:Sony Sub

पुढील काही भागात याबद्दल खरे खोटे समजणार असून परंतु मालिकेच्या फॅन्स मध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मालिकेच्या लाखो फॅन्स ना वाटत आहे की जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी मालिका सोडून जाणार आहे. परंतु, हे खोटे असून फक्त मालिकेत तो गोकुळधाम सोसायटी सोडणार की नाही याबद्दल लवकरच प्रेक्षकांना समजणार आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *