गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील उन्नाव जिल्ह्यात अशा काही घटना घडलेल्या पाहायला मिळाल्या, ज्यामुळे संपूर्ण भारत हादरवून निघाले. बलात्कार, हत्या अशा घटनानी उन्नाव जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच आता 3 बहिणी शेतात बेशुध्द अवस्थेत पडलेले आढलल्याने एकच खळबळ माजली आहे.


उन्नाव जिल्ह्यातील बबुरहा गावातील 3 अल्पवयीन मुली कोमल(16), काजल(13) आणि रोशनी(17) या दुपारनंतर जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. परंतु खूप वेळ झाले घरी न आल्यामुळे घरच्यांनी त्यांची शोधा शोध सुरू केली. शेतात गेल्यानंतर त्यांनी या तिघींना दुपट्ट्या मध्ये बांधलेले पाहिले.

कोमल, काजल, रोशनी या तीन अल्पवयीन मुली शेतात बेशुध्द अवस्थेत सापडल्या. यात कोमल व काजल यांचा जागीच मृत्यू झाला. परंतु रोशनी वर सध्या दवाखान्यात उपचार चालू असून ती अजूनही बोलण्याच्या अवस्थेत नाही. प्राथमिक तपासणी नंतर शव परिक्षणा नंतर कीटकनाशकांचे सेवन केल्याने ही घटना घडल्याची समजते.

पोस्टमोर्टम रिपोर्ट नुसार या तिघींच्या अंगावर कोणतेच निशाण सापडले नाहीत. तसेच, गळा दाबल्याचे देखील कोणतेच निशान सापडले नाहीत. गुप्त अंगावर देखील कोणतीच जखम दिसून आली नसल्याचे रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले. असे असले तरी पीडितांच्या वडिलांनी हत्या असल्याची केस दाखल केली असून सीबीआय चौकशीची मागणी करण्यात येत आहे. उपचार घेत असलेली मुलगी शुद्धीवर आल्यास सर्वकाही उघड होईल.

याबद्दल तुमची प्रतिक्रिया कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *